मे महिन्यात वीज ग्राहकांना अतिरिक्त बिलाचा शॉक


रीडींग एजन्सीच्या असंख्य चूका : वरीष्ठांनी दखल घेण्याची अपेक्षा

भुसावळ : फेब्रुवारी-मार्च-एप्रिल 2021 देयकात श्रीनगर, खळवाडी, हुडको कॉलनी, भोई नगर, कांशीराम नगर विभागातील अनेक वीज ग्राहकांना मे महिन्यात महावितरणने अतिरिक्त बिलाचा शॉक दिला आहे. ग्राहक नलिणी अरुण तळेले, धनंजय सोनवणे, चंद्रकांत पाटील, काशिनाथ गुळवे, मधुसूदन ढाके, अशोक सोनवणे, ज्ञानदेव गुळवे, मुरलीधर यशवंत महाजन, अरुण गोविंदा लोखंडे, राधाबाई शंकर सोनवणे, काशीनाथ गुळवे, धनेश पाटील व इतर अनेक ग्राहकांना चुकीचे रीडींग पाठवून अतिरिक्त रक्कम आकारण्यात आली. वीज ग्राहकांनी मार्च महिन्यातच याबाबत कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

दोषी एजन्सीवर कठोर कारवाईची मागणी
एजन्सीने ग्राहकांना वेळेत देयक सादर केले नाही व रीडींगमध्येही वारंवार चुका केल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळात ग्राहकांना महावितरण कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागल्यात. याचा परीणाम महावितरणचे अनेक कर्मचारी व ग्राहक कोरोनाच्या विळाख्यात सापडले तर काही कोरोनामुळे दगावले, म्हणून या एजन्सीवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी नागरीकांची मागणी आहे.



घर बंद असतानाही अवाजवी रीडींग
दोन वर्षांपासून अनेक वेळा तक्रारी केल्या. कर्मचारी येतात सुधारीत बिल देतात परंतु पुढच्या महिन्यात पुन्हा तीच परीस्थिती निर्माण होते. आधी जिनस मीटर कंपनीच्या कर्मचार्‍यांनी चुका केल्या आता रीडींग एजन्सी चुका करतेय. घर बंद असतांना सुद्धा अतिरिक्त रीडींग टाकले जात आहे, असे वीज कंपनीच्या श्रीनगरातील ग्राहक अरुण तळेले म्हणाल्या.

तक्रारीनंतर दखल नाही
ग्राहकाने मोबाईल वरून तक्रार केल्यास ती लवकर दुरुस्त होत नाही, आधी बिल भरा मग तक्रार सोडवू, असे सांगितले जाते. चूक एजन्सी करते, महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांना हेलपाट्या होतात. अचूक बिले दिली पाहिजे. ग्राहकांच्या वेळेवर त्यांच्या समस्या सुटल्यास त्यांना कार्यालयात जावे लागणार नाही. परीणामी कोरोना रोखता येईल. मुख्य समस्या वारंवार सांगून सुद्धा महावितरणने लक्ष दिले नाही, असे भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !