जळगाव जिल्ह्यात या शहरात सर्वाधिक आढळले रुग्ण
24 तासात पुन्हा 16 रुग्णांचा मृत्यू : एकाच दिवसात 720 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 877 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 16 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2320 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 29 हजार 49 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 17 हजार 9 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



