वरणगाव ऑर्डनन्समध्ये 56 वर्षांनंतर 20 कोटींचे अ‍ॅम्युनेशन उत्पादन


वरणगाव : वरणगाव आयुध निर्माणीने स्थापनेच्या 56 वर्षानंतर प्रथमच पहिल्यांदाच तब्बल एक कोटी एवढ्या संख्येत 5.56 एमएम एम-193 अ‍ॅम्युनेशनचे उत्पादन शुक्रवारी अमेरीकेत रवाना करण्यात आले तर त्याची किंमत सुमारे 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. अमेरीकेतील एका खाजगी संस्थेने आयुध निर्माणीला या उत्पादनांची ऑर्डर दिली होती. या कामगिरीमुळे वरणगाव आयुध निर्माणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. वरणगाव आयुध निर्माणीद्वारा एक कोटी आणि खडका येथील निर्माणीद्वारे 14 लाख असे 1 कोटी 14 लाख एवढ्या संख्येचे उत्पादन महाप्रबंधक सुशांतकुमार राऊत व अपर महाप्रबंधक राजीव गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गाड्यांचा ताफा चेन्नईकडे रवाना झाला.

चेन्नई बंदरावरुन उत्पादन जाणार अमेरीकेला
चेन्नई बंदरावरुन जहाजाद्वारे हे उत्पादन अमेरिकेला पाठवले जाईल. या गुणवत्तापूर्ण उत्पादनाबद्दल महाप्रबंधक राऊत यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले. तसेच जुलै अखेरपर्यंत पुढील एक कोटी उत्पादनाची ऑर्डर पूर्ण करावी, असे आवाहन केले. यावेळी भारतीय मजदूर संघाचे योगेश सूर्यवंशी, बी.बी.सपकाळे, विजय जगताप, सचिन चौधरी, इंटक युनियनचे रवींद्र देशमुख, महेश पाटील व कामगार युनियनचे विशाल भालशंकर, संदिप पाटील, कार्यप्रबंधक विजय कुरारिया उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !