भुसावळात लष्करातील जवानाने गळफास घेत संपवले जीवन
भुसावळ : भुसावळातील लष्करी डेपोतील लष्करातील जवानाने गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9.50 वाजेपूर्वी ही घटना उघडकीस आली. कुंदनसिंग भवरसिंग (38, राजस्थान) असे मयत जवानाचे नाव आहे. जवान कर्तव्यावर न आल्याने त्याबाबत माहिती घेतली असता जवानाने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. कुंदनसिंग भवरसिंग हे जवान आर्मीच्या 118 टीए इन्फन्ट्री बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. जवानाने आत्महत्या का केली? याचे ठोस कारण कळू शकले नाही. भुसावळ शहरात पोलिसात सुभेदार संतोषकुमार येडे यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक बाबासाहेब ठोबे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.




