भुसावळात रुग्णवाहिकेचे लोकार्पण


भुसावळचे उपक्रमशील नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ : आपणही समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनेतून भुसावळातील उपक्रमशील नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर यांनी रविवारी शहरवासीयांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते महाराणा प्रताप चौकात झालेल्या कार्यक्रमात श्रीफळ वाढवून एका छोटेखानी कार्यक्रमात या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन करण्या आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पत्रकार संजयसिंग चौव्हाण, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकू, खडका येथील उघोजक सुरतसिंग पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, राजेंद्र नाटकर, किरण कोलते, परीक्षीत बर्‍हाटे, महाराणा प्रताप जयंती समितीचे अध्यक्ष निखील राजपूत, रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अनिरुद्ध कुलकर्णी, खडका येथील अमोल पाटील, अनुपसिंग ठाकूर, सुरेंद्रसिंग पाटील, प्रदीप पाटील, नरवीरसिंग राऊळ, संजयसिंग पाटील, संदीप राणा, दामोदर राजपूत, चंदूसिंग चव्हाण, विकी राजपूत, सोनी ठाकूर, गणेश पाटील, विशाल राजपूत, नकुल राजपूत, मोहन ठाकूर, सागर ठाकूर, शंभू ठाकूर, अरुण धनगर, जुगल ठाकूर, संजू ठाकूर, उद्धवसिंह ठाकूर, मंगलसिंग ठाकूर, कैलास भोळे, देविदास भोळे (कंडारी), चंदूसिंग बोरसे, सोनूसिंह पाटील, देवेश ठाकूर, सुरेशसिंह ठाकूर, सुरेंद्रसिंह पाटील, आनंदासिंह पाटील यांच्यासह भुसावळ शहर व तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !