अपघातानंतर दोन गटात पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी : 19 जणांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील निमगाव येथे दोन मोटरसायकलीच्या अपघातानंतर जखमीस येथील ग्रामीण रुग्नालयात उपचारार्थ आणले असता दोन्ही गटात रुग्नालय आवारातच झालेल्या वादविवादानंतर तुफान हानामारी झाली. तत्काळ
पोलिसांना पाचारण करण्यात आले मात्र दोन्ही गट एवढे संतप्त होते की, पोलिांनाही आवरणे कठीण झाल्याने पोलिसांची अधिकची कुमक बोलावून दोन्ही गटाकडील 19 संशयीतांवर ठाण्यात आणून उपद्रव करण्याच्या गुन्ह्यातसह साथरोग नियंत्रणाच्या भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही गटाच्या 19 जणांविरुद्ध गुन्हा
सुजीत उत्तम पाटील व रोहन संजय अहिरे व इमाम रजाखान समीरखान, अहमद रजाखान यांच्या दुचाकीत धडक झाल्यानंतर झालेल्या अपघातता चौघे जखमी झाले. भुसावळकडून-यावलकडे येत असतांना हा अपघात झाला. जखमीनां येथील ग्रामीण रुग्नालयात उपचारार्थ आणले असता दोन्ही गटात वादविवाद होवून तुफान हाणामारी झाली. घटनेचे वृत्त पोलिसांना कळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्नालय गाठले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही उपद्रवींमध्ये हाणामारी सुरूच असल्याने पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी पोलिसांची जादा कुमक पाठवून उपद्रवींना पोलिस ठाण्यात आणले. संशयीतांविरुद्ध भादवी कलम 160, 188 सह मुंबई पोलीस कायदा 112, 117 तसेच 37 (1)व (3) चे उल्लंघन, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.नितीन चव्हाण करीत आहेत.



यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी सागर तावडे, भुषण तावडे, नितीन तावडे, आशिष तायडे, राकेश पाटील, हर्षल कोळी, तुषार कोळी, किरण तावडे, गणेश चौधरी, सागर पाटील, सागर तायडे धरमसिंग पाटील, अमोल तायडे (निमगाव) व यावल येथील मोहसीन तस्लीम खान, मजहर अजहर खान, परीध तस्लीमखान, मोहम्मद अकीब अकीलोद्यीन, जावेद हनिफ खाटीक, महम्मद कैब अकीलोदीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

