मनुर बु.॥ परीसरातील शेतकर्यांची ठिबक चोरीला
बोदवड : तालुक्यातील मनुर बु.॥ पयेथील शेतकरी नाना रामभाऊ पाटील याच्या शेतातील पाच एकरातील जैन कंपनीची ठिबक चोरीला गेली असून दिनांक 9/5 रोजी त्यानी बोदवड पोलिस स्टेशनला अन्यात चोरट्यांविरुद्द फिर्याद दाखल केली आहे. मनुर बु.॥ शिवारातील गट क्र.55/2 या पाच एकर शेतातील ठिबकच्या 22 बंडल व दोन इंची पंधरा पाईप शेतातील निंबाच्या झाडाखालून अज्ञात चोरट्यांनी दिनांक 28 एप्रिल ते 3 मे या तारखेच्या दरम्यान नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसानी पंचनामा केला असुन पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे करीत आहेत. मनूर परीसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून विलास देशमुख, अनिता वनारे, ईश्वर सोनोनी यांच्या शेतातून ईलेक्ट्रॉनिक पोलची वायर सुद्धा कापुन नेली तसेच राजेंद्र शेळके यांच्या शेतातील महादेवाचे मंदिर असून महादेवाच्या पिडींवरील ताब्याचा कळस सुद्धा चोरून नेला. काही दिवसां अगोदर मनुर बु.॥ येथील प्रमोद पाटील यांच्या खळ्यातुन नागर सुद्धा चोरीला गेले आहे.




