केंद्रासह राज्याकडील मोफत धान्य रावेरात दाखल


रावेर : शासनाकडून लॉकडाऊन काळात निकषातील लाभार्थींना मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मे व जून या दोन महिन्याचे धान्य रावेरात गोदामात दाखल झाले आहे. या महिन्यांत राज्य सरकारचे नियमित मिळणारे धान्य मोफत मिळणार आहे तर याच महिन्यात केंद्राचे सुध्दा धान्य मोफत मिळणार आहे. शासनाकडून मोफत वाटप करण्यात येणारे धान्य रावेर गोडाऊनवर प्राप्त झाले आहे. या महिन्यात दोन वेळेस मोफत धान्य गरीब कुटुंबाना मिळणार आहे. यामध्ये गहू व तांदूळ यांचा सामावेश आहे. गरीब लाभार्थी कुटुंबानी लक्ष ठेवून या महिन्यात दोन वेळा मोफत धान्य न्यावे, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रती व्यक्तीला पाच किलो धान्य
या महिन्यात मोफत धान्य देण्यात येणार आहे.. यामध्ये राज्य सरकारचे प्रतिव्यक्तीला पाच किलो प्रमाणे गहू व तांदुळ मिळणार आहे तर केंद्रातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रतिव्यक्तीला पाच किलो प्रमाणे गहू व तांदुळ मिळणार आहे तर अंत्योदय लाभार्थींना साखर 20 रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे.



भ्रष्ट्राचार होऊ नये म्हणून समिती गठीत
मोफत धान्य गरीब कुटुंबाना वितरीत करतांना त्यात भ्रष्ट्राचार होऊ नये म्हणून पुरवठा विभागाकडून शहर व ग्रामीण भागात समिती गठित करण्यात आली आहे. यातील नेमणूक करण्यात आलेले शासकीय कर्मचारी रेशन दूकानावर उपस्थित राहतील व त्यांच्या समोर मोफतचे धान्य गरीब कुटुंबाना वाटप करण्यात येणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !