आपले मानवाधिकार फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी मयुर अंजाळेकर
भुसावळ : आपले मानवाधिकार फाऊंडेशनच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी मयुर राजेंद्र अंजाळेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. फाउंडेशन चे संचालक ध्यान तज्ञ व समुपदेशक दीपेश पष्टे व सहसंचालक वैभव हरड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनोहरजी भोई, उपाध्यक्ष नितीन सैद, अतुल जी.चौधरी, प्रमुख अनिता सातपुते, महासचिव हनुमंतजी मोरे, सचिव अनुपमा इंगळे, सहसचिव फिरोज खान पठाण, प्रचारक विठ्ठलजी ढेंबरे, जनसंपर्क प्रमुख दिवेशजी पष्टे, व्यवस्थापक अनिल ठोंबरे, सागरजी कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर अंजाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. गतवर्षी 2020 मधे कोरोनाच्या महाभयंकर काळात मयुर राजेंद्र अंजाळेकर यांनी गरजू 1400 घरांमध्ये धान्य वाटप केल्याने त्यांना फोरेव्हर स्टार इंडियाकडून द रियल सुपर हिरोचा पुरस्कारही मिळाला. नियुक्तीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




