वरणगावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करा


माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांच्याकडे भाजयुमोची मागणी

वरणगाव : वरणगाव शहरातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरीकांना सरकारने मोफत लस 1 मे पासून देण्याचे जाहीर केले आहे मात्र वरणगाव शहरात आजपर्यंत सुद्धा लसीकरण सुरू झालेली नाही. वरणगावातील तरुणांवर अन्याय जिल्हा प्रशासन का करीत आहे ? वरणगाव ग्रामीण रुग्णालय एक केंद्र व मराठी शाळा येथे एक केंद्र असे दोन लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी सोमवारी माजी मंत्री भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजयजी सावकारे यांच्याकडे भारतीय जनता पार्टी व भाजयुमोतर्फे निवेदन देउन करण्यात आली.

जिल्हाधिकार्‍यांशी केली चर्चा
माजी मंत्री आमदार संजय सावकारे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे तात्काळ वरणगावात 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्याबाबत आमदारांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ पत्रही पाठविले. आमदार सावकारे यांना निवेदन देण्यापूर्वी वरणगाव ग्रामीण रुग्णालयांत भाजपा व भाजयुमो तर्फे ग्रामीण रुग्णालयात 18 ते 44 वयोगटातील तरुणांना शहरात कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले. यावेळी वैदयकीय अधिकारी डॉ.क्षितिजा हिंडवे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.क्षितिजा हिंडवे यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना भावना कळवण्याचे आश्‍वासन दिले.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमोचे शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा शहराध्यक्ष, प्रणिता पाटील चौधरी, सरचिटणीस आकाश निमकर, शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, संजयकुमार जैन, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, युसूफ खान, गोलू राणे, डॉ.प्रवीण चांदणे, पप्पू ठाकरे, मिलिंद भैसे, नटराज चौधरी आदींचा सहभाग होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !