लॉकडाऊनने रोजगार हिरावला : प्रपंच चालवण्याच्या चिंतेत पत्नी व चिमुरड्याची हत्या करीत पतीचीही आत्महत्या


पुणे : लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर प्रपंच चालवण्याच्या चिंतेत पतीने स्वतः गळफास घेतला व तत्पूर्वी दिड वर्षीय चिमुकल्यासह पत्नीची सुर्‍याने हत्या केल्याची काळजी पिळवटून टाकणारी घटना पुण्यातील लोणी काळभोरच्या कदम वाकवस्ती येथे सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हनुमंत दर्याप्पा शिंदे (38, मूळ गाव बक्षीहिप्परग, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर), प्रज्ञा हनुमंत शिंदे (28) आणि शिवतेज (1 वर्ष 2 महिने) अशी मृतांची नावे आहेत. सिमेंट टेम्पोवर ड्रायव्हर असलेल्या हनुमंतला लॉकडाऊनमुळे काम नसल्याने तो घरीच होता. प्रपंच चालवण्यासाठी ओढाताण होत असताना दाम्पत्याने वाद होत असल्याने हनुमंतने पत्नी व चिमुकल्याची सुर्‍याने गळा चिरून हत्या केली व स्वतः नंतर आत्महत्या केली. दाम्पत्य खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावजा कुणीही बाहेर न आल्याने ही घटना उघडकीस आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !