भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमधील ऑक्सीजन प्लाँटमुळे मोठी उपलब्धी


माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे : ग्रामीण रुग्णालयाला सामाजिक दातृत्वातून दोन लाखांची औषधी भेट

भुसावळ : भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये शंभर खाटांचे ऑक्सीजन सेंटर उभे राहिल्यामुळे रुग्णांना मोठी उपलब्धी निर्माण झाली असून उपचाराची सोय झाली आहे. 2014 मध्ये मी पालकमंत्री असताना ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला पैसा उपलब्ध करून दिला शिवाय ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासह स्टाफ वाढवण्यासाठी प्रयत्न केला, असे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे येथे म्हणाले. भुसावळातील लोकप्रतिनिधींनी सामाजिक भावनेतून ग्रामीण रुग्णालयाला सुमारे दोन लाखांच्या औषधी मंगळवारी पुरवठी सुपूर्द केली. याप्रसंगी माजी मंत्री खडसे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

रुग्णालयाला सुमारे दोन लाखांची औषधी भेट
रुग्णालयाला यावेळी इंजेक्शन, औषधी, दहा ऑक्सीमीटर, 60 लीटर सॅनिटायझर लीटर, एन 95 200 मास्क तसेच रुग्णांसाठी 70 पिले मिळून सुमारे दोन लाखांची औषधी देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या छोटेखानी कार्यक्रमास दीपनगरचे माजी अभियंता आर.आर.बावस्कर, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रमोद पाटील, अनिकेत पाटील, संदीप देशमुख, उसामा रऊफ खान, रमेश मकासरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुकर चाधरी यांच्यासह रुग्णालयाला औषधी देणारे दाते उपस्थित होते.

औषधी पुरवठ्यासाठी यांचे दातृत्व
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, प्रा.सुनील नेवे, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेवक हाजी मुन्ना तेली, शेख शफी शेख अजीज, मुकेश गुंजाळ, मुकेश पाटील, राजकुमार खरात, देवा वाणी, पुरूषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, दिनेश नेमाडे, संदेश सुरवाडे, प्रमोद पाटील, प्रशांत अहिरे आदींनी रुग्णालयाला औषधी देण्याकामी सहकार्य केले.

माजी अभियंत्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
दीपनगर प्रकल्पातून सेवानिवृत्त झालेले माजी अभियंता आर.आर.बावस्कर हे ट्रामा केअर सेंटरमधील औषध वितरण कार्यक्रमात विशेष उपस्थित असल्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींच्याही भुवया उंचावल्या. बावस्कर हे आगामी काळात राजकारणात सक्रिय तर होणार नाही ना? असादेखील प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !