सामाजिक दातृत्व : भुसावळ ग्रामीण रुग्णालयात अडीच लाखांची औषधी भेट


भुसावळ : समाजाचं आपण काही देणं लागतो या सामाजिक भावनेतून शहरातील साई सेवा समिती मित्र परीवार व अन्य दात्यांनी मंगळवारी भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरसाठी दोन लाख 49 हजारांची औषधे दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी यांच्याकडे ही औषधी सुपूर्द करण्यात आली.

साई सेवा समितीसह दात्यांचा पुढाकार
भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी औषधांसाठी 30 हजार, अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाने 25 हजार, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी 20 हजार, रा.रा.पाटणकर सर यांनी 15 हजार, उषा घनश्याम बुला यांनी 11 हजार, विजयजी ठक्कर यांनी 10 हजार, शंकरराव शेषराव देशमुख यांनी पाच हजार तसेच काही दात्यांनी नाव आणि रक्कम गुप्त ठेवण्याची विनंती केल्यानंतर एकूण दोन लाख 49 हजार रुपयांची औषधे देण्यात आली. दरम्यान, काही औषध पुरवठादारांनी औषधांचा पुरवठा करताना अत्यप्ल नफा आकारला.

औषधांमुळे रुग्णांवर उपचारासाठी मोठी मदत
ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने या औषधांमुळे आता गरजू रुग्णांवर उपचाराची मोठी सोय होणार आहे. रीवारॉक्स, फ्रॅसिक्स, विनफिलिन इंजेक्शन, फेराविर, कॅडटाझो इंजेक्शन,
रेनसेफ, पॅनपॅझोल, ओन्डोसल, डेक्सासोन इंजेक्शन, लॅटेक्स एक्झामिनेशन, टॅझोऐश, रिफॉक, पॅटोलॅक्स तसेच सॅनिटायजर, हँड ग्लोव्हज, पाचशे एन 95 मास्क देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या सदस्या भगिनी, अ‍ॅड.निर्मल दायमा, दीपक टेकवानी, उषा घनश्याम बुला, साई सेवा समितीचे सर्व सदस्य व मित्र मंडळी व वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, डॉ.फेगडे, डॉतळेले, डॉ.चाकूरकर, एलियाज, अझीम शेख, अतुल माळी, गणेश चौधरी, कुणाल जगताप उपस्थित होते.

सहभागाचे आवाहन
नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले की, आपल्या छोट्याशी मदतीनेदेखील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून दात्यांनी रुग्णालयाला औषध पुरवठ्यासाठी पुढे येवून सामाजिक कार्यात सहभागी झाल्यास कार्य आणखी जोमाने पुढे सुरू राहणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !