कडक सॅल्यूट ! : रुग्णांसह नातेवाईकांच्या जेवणासाठी मोडली सोन्याची अंगठी


मुक्ताईनगर : सामाजिक कार्यासाठी पदरमोड करणार्‍यांची संख्या कमी नाही मात्र कोरोनाच्या कठीण काळात उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची आबाळ होत असल्याने युवा शक्ती प्रतिष्ठाण मुक्ताईनगरचे अध्यक्ष पंकज सुधाकर कोळी यांनी सामाजीक भावनेतून स्वतःची आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी मोडून गरजु लोकांसाठी विनामुल्य जेवण डबा सुरू करून रुग्णांना मोठा दिलासे काम सुरू केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, भुसावळ, मलकापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचार घेऊन बरे होत आहेत. या ठिकाणी रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल न होण्यासाठी पंकज कोळी यांच्या उपक्रमाला हिंदूसिंधू तीर्थस्थळ जळगांव व हिंदुराष्ट्र सेना जळगांव जिल्हा यांची मदत होत आहे तसेच या सेवेत त्यांचे सहकारी संतोष कोळी, अ‍ॅड.राहुल पाटील, वंदे मातरम ग्रुपचे धनराज सापधरे, शुभम तळेले, शुभम तायडे, अर्जुन कोळी, शुभम कोळी, योगेश सोनार, विष्णू कोळी, अनुज पाटील, प्रदीप सोनार, नरेश मराठे, गजानन धाडे, व शहरातील युवकांचा हातभार लागत आहे. या काळात पंकज कोळी व त्यांच्या टीम करत असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवाय अनेक दानशूर व समाजसेवकांनी या कार्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !