भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये पुरेसा औषध पुरवठा व्हावा
जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी : औषध पुरवठ्याचे तत्काळ आदेश
भुसावळ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी भेट घेत भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे औषध साठा उपलब्ध करण्याची मागणी केली. निवेदनाची दखल घेत मंत्री टोपे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना फोनद्वारे व लेखी स्वरूपात सूचना करीत पुरेसा औषध पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, सुभाषजी बनिये उपस्थित होते.




