p>

अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे : शिक्षकाला कोठडी


यावल- खाजगी शिकवणी क्लासेसमध्ये शिकवणीला येणार्‍या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणार्‍या शिक्षकाला अटक केल्यानंतर न्यायलयाने रविवारी त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावल शहरातील न्यु श्री व्यास नगरी धील शिकवणी घेणार्‍या वर्ग चालकाकडुन शहरात राहणार्‍या एका 12 वर्षीय शिकवणीला येणार्‍या बालिकेशी गेल्या दोन महिन्यापासून क्लासेसमध्येच असलेल्या एका खोलीत अल्पवयीन तरुणीशी चाळे करण्यात आले. 18 सप्टेंबर रोजी त्या बालिीकेशी अश्लील चाळे करीता असतांना पीडीतेच्या आईने पाहिल्यावर या घटनेतील संशयीत आरोपी अभिषेक छेदीलाल पाल (25, रा.कानपुर, उतरप्रदेश, ह. मु.उल्हासनगर, मुंबई )याच्या गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आरोपीला भुसावळ न्यायलयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, रविवार, 22 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, यावल तहसीलचे बी.व्ही. पाटील आणि तलाठी समीर तडवी यांच्यासह बालिका व तिची आई यांच्या समक्ष घटनास्थळी जावुन पंचनामा केला.


कॉपी करू नका.