फैजपूर म्युन्सीपल हायस्कूलमध्ये आजपासून लसीकरण होणार सुरू
फैजपूर : शहराची लोकसंख्या जास्त असल्याने फैजपुरात लसीकरण सुरू व्हावे ही मागणी मान्य झाली असून शहरातील म्युनिसीपल हायस्कूलमध्ये कोविड लसीकरण गुरुवार, सकाळी सात वाजेपासून नाव नोंदणी करून आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थिती सुरू होत आहे. यामध्ये वय वर्ष 45 वरील नागरीकांना लस दिली जाणार आहे. गरजूंनी आधार कार्ड सोबत घेऊन लसीकरणासाठी यावे, असे आवाहन नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्षा नयना चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, काँग्रेस गटनेते कलिम मण्यार, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी यांनी केले आहे. नागरीकांनी सोबत आधार कार्ड घेऊन यावे.तोंडाला मास्क कोरोना नियमाचे पालन करावे. पालिकेने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे, असे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.




