धोका अजून टळला नाही : राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यातत येत नसल्याने त्यास आळा घालण्यासाठी 1 जूनपर्यंत कडक निर्बंध (लॉकडाऊन) लावण्याचा निर्णय ठाकरे सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे.सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले मात्र त्यानंतर 15 मे पर्यंत निर्बंध वाढवण्यात आले व आता 1 जूनपर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 1 जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.
राज्यात बाहेरून येणार्या कोरोना चाचणी अनिवार्य
राज्याच्या बाहेरून येणार्या प्रत्येक व्यक्तीला आरटीपीसीआर कोरोना चाचणी निगेटिव्ह रीपोर्ट असणं बंधनकारक करण्यात आले असून ही चाचणी प्रवाशाने प्रवास करण्याच्या 48 तासापूर्वीची असायला हवी, असे परीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. माल वाहतूक करणार्या गाड्यांमध्ये चालक, क्लिनर या दोघांशिवाय इतरांना प्रवास करण्यावर बंदी आहे. जर माल वाहतूक इतर राज्यातून महाराष्ट्रात होत असेल तर त्यांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल देणं बंधनकारक करण्यात आले आहे.


