आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने रावेर-फैजपूर पालिकेला चार कोटी 92 लाखाचा निधी
रावेर : रावेर मतदारसंघातील नगरपरीषदांच्या विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असलेले आमदार शिरीष चौधरी यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने रावेर व फैजपूर विकासकामांसाठी चार कोटी 92 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
या कामांसाठी निधी मंजूर
यामध्ये प्रभाग क्रमांक 1 हनुमान व्यायम शाळेपासून ते प्रकश जोशी यांच्या घरापर्यत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र.3 मध्ये श्रीराम अग्रवाल यांचे दुकानापासून ते घासबाजार पर्यत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र.6 मस्तनशहा दर्गा पासून ते संभाजीनगर पुलापर्यत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र.7 निजाम बेकरीपासून ते मस्तानशहा दर्ग्यापर्यत ब्लॉक बसविणे, प्रभाग क्र.8 श्री शनी मंदिरापासून ते रेल्वे स्टेशन गेट पर्यत रस्ता डांबरीकरण करणे, श्रीराम महाजन यांच्या घरापासून ते छोरीया मार्केटच्या गेटपर्यत रस्ता काँक्रीटीकरण करणे, ईदगाहपासून ते कौसर मस्जीदपर्यत रस्ता डांबरीकरण करणे, मण्यार कब्रस्थानपासून ते बर्हाणपूर पुलापर्यत रस्ता काँक्रीटीकरण व गटार तयार करणे, प्रभाग क्र.8 डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील रतीराम घेटे यांच्या घरापासून कै.अंबादास गजरे यांच्या घरापर्यत गटारीसह रस्ता काँक्रीटीकरण करणे, ऊर्दू स्कूल नं.1 सौकत मैदानमध्ये काँक्रीटीकरण करणे, रावेर रोड ते राजीव नगर व अग्रसेन भवन पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे आदी कामांसाठी दोन कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.

फैजपूर शहरासाठी दोन कोटी 39 लाख मंजूर
फैजपूर शहरासाठी दोन कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एकूण चार कोटी 92 लाख रुपयांचा निधी या नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी ‘विशेष अनुदान’ योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल, अशी माहिती आमदार कार्यालयाकडून देण्यात आली.

