प्रत्येक तालुक्यात पत्रकार व वृत्तपत्र एजंट-वितरकांसाठी व्हावे कोवॅक्सीन लसीकरण
पत्रकार कमलाकर माळी यांची प्रशासनाकडे मागणी
रावेर : कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या पाहता अशा विपरीत परीस्थितीही पत्रकार वृत्तसंकलन तर वृत्तपत्र एजंट व वितरक वाचकांना न चुकताच सर्व धोका पत्करून वृत्तपत्र पोहोचण्याचे काम गत वर्षभरापासून अविरत करीत आहेत. अशा परीस्थितीत कोरोना योद्धा म्हणून काम करणार्या या घटकांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर कोवॅक्सीन शिबिर सुरू करावे, अशी मागणी वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी यांनी केली आहे.
कठीण काळातही अविरत कर्तव्य
ऊन, वारा वा पाऊस असो अशा कठीण काळातही शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे आपापल्या परीसरातील घटना-घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोरोना संकटाची काळजी न करता पत्रकार बाहेर पडत आहे. कोरोना संकटाचा सामना करताना जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधवांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. दरम्यान, तर वाचकांपर्यंत एजंट व वितरकदेखील दररोज न चुकता वृत्तपत्र पोहोचण्याचे कार्य करीत असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता या घटकासाठी तालुका स्तरावर स्वतंत्रपणे शिबिर आयोजीत केल्यास पत्रकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



