भुसावळात भगवान परशुराम जयंती साजरी
भुसावळ : भगवान परशुराम जयंती निमित्त येथील तापी काठावरील भगवान परशुराम मंदीरात उत्सव समिती व विविध पदाधिकार्यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 14 रोजी सकाळी 10 वाजता भगवान परशुरामांच्या मुर्तीला माल्यार्पण करुन आरती करण्यात आली. कार्यक्रमानंतर येथील श्री गजानन महाराज मंदीर परिसरातील गरीब गरजूंना मास्क व जेवाचे पाकीटांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदीरात वाटर कुलरचे लावण्याबाबत नियोजन करण्यात आले. प्रसंगी यावल रस्त्यावरील दगड फोडणार्या कष्टकर्यांना कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरख मास्क व तसेच कोरोना वायरस लक्षात घेता वाफ घेण्याचे मशीन वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी परशुराम जयंती उत्सव समिती, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवा आघाडी, पुरोहित आघाडी, ब्राह्मण समाज सेवा मंडळ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी, राजस्थानी वि.प्र. समाज नवयुवक मंडळ व विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच समिती अध्यक्ष उमाकांत शर्मा (नमा), कैलाश उपाध्याय, भूषण वैद्य, विनोद शर्मा, प्रशांत वैष्णव, देवेश कुलकर्णी, पाथरकर गुरुजी, अनिरूद्ध कुलकर्णी, अभिलाष नागला, वेद औजा, अभिजीत मेने, श्रीकांत जोशी, गौरव हिंगवे, गौरव शर्मा, आदित्य शर्मा, शंतनु गजके आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी श्री भगवान परशुराम यांना कोरोना महामारीच्या नायनाटाबाबत प्रार्थना करण्यात आली.



