झन्ना-मन्ना जुगार खेळताना आठ जुगारी जाळ्यात : दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात


रावेर : रावेर ते सावदा रोडवरील रसोई हॉटेलमागे केळी बागेत जुगार सुरू असताना पोलिसांनी धाड टाकत आठ जुगार्‍यांना ताब्यात घेत दोन लाख 2 हजार 690 रुपये रोख व जुगाराची साधने जप्त केली. पंकज नामदेव महाजन (32, डेली भाजी मार्केट, रावेर), विकी प्रताप पाटील (28, अग्रसेन भवन रावेर), हर्षल अरुण बेलस्कर (28, नागझिरी रोड, रावेर), पूर्वेश गणेश महाजन (22, महात्मा फुले चौक, रावेर), संतोष शांताराम चौधरी (45, अफुगल्ली गल्ली, रावेर), सुरज मोतीलाल भोई (22, भोईवाडा, रावेर), अतुल पुनमचंद परदेशी (25, स्वामी विवेकानंद चौक, रावेर), भूषण दिलीप सोनार (30, विद्यानगर, रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या आदेशान्वये महेंद्र शांताराम सुरवाडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !