भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईचा ‘दंडुका’


भुसावळ : कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोमवारपासून शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात करण्यात आली. शहर व बाजारपेठ हद्दीत विनाकारण बाहेर फिरणार्‍यांच्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत शिवाय 11 वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणार्‍या व्यावसायीकांच्या पाच दुकानांना दुपारपर्यंत सील ठोकण्यात आल्याने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

खाकीच्या कारवाईचा नागरीकांनी घेतला धसका
सकाळी सात वाजेपासून पोलिस व पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरताच नागरीकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सब कुछ चलता है म्हणणार्‍या पाच व्यापार्‍यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करताच व्यापार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी शहरातील मुख्य चार पॉईंटवर नाकाबंदी केली आहे शिवाय 11 वाजेनंतर विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, बाजारपेठ व रजा टॉवरजवळ नाकाबंदी करून आरपीटीपीसीआर टेस्ट केली जात ओ शिवाय शहर हद्दीत दोन व बाजारपेठ हद्दीत पाच अशी सात पथके अनावश्यक दुकाने खुली ठेवणार्‍यांवर कारवाई करीत आहे. शहरातील मध्यवर्ती मार्केट सील करण्यात आले असून सोमवारी शहरातील विविध पाच भागात भाजी बाजार भरवण्यात आला शिवाय तो काटेकोरपणे 11 वाजताच बंद झाला.



 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !