भांडण सोडवण्याच्या रागातून तरुणावर चाकूहल्ला


यावल : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडवल्याने शहरातील पाच जणांनी एका तरूणावर चाकु हल्ला केला तर त्यांच्या कुटुंबास लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्‍या गटाकडून देखील चार जणांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीचा कट लागल्यावरून वाद
स्वामिनारायण नगरातील रहिवासी राहुल संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश घारु व भारत धर्मा घारु यांचा दुचाकीचा कट लागला या कारणावरून बापु महाजन यांच्या सोबत भांडण होत होते ते फिर्यादीने सोडवले याचा राग येत फिर्यादीच्या घरासमोर येत अमर जगु घारु व उमेश जगु घारु यांनी त्यांचे दोन्ही हात धरुन धर्मा जगु घारु याने त्याच्या हातातील चाकुने पोटात बरगडीजवळ दुखापत केली तर करण उमेश घारु व भारत धर्मा घारु यांनी हातात काठ्या घेवून फिर्यादीचे चुलत भाऊ एकनाथ दुर्गादास चव्हाण तसेच महेंद्र दुर्गादास चव्हाण व चुलते दुर्गादास गणेश चव्हाण अशांना काठ्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अमर घारु, उमेश घारु, धर्मा घार, करण घारु व भारत घारु या पाच जणांविरूध्द यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीरक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजमल पठाण करीत आहे. दरम्यान, दुसर्‍या गटाचे विश्वनाथ उमेश घारु यांच्या फिर्यादीनुसार राहुल संजु चव्हाण, संजु गणेश चव्हाण, दुर्गादास गणेश चव्हाण, प्रल्हाद गणेश चव्हाण यांनी पूजा अक्वासमोर वरील कारणावरून फिर्यादीस चापटा-बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !