सावद्याच्या आकाश पाटील अमेरीकेत स्काय डायव्हिंगमध्ये चित्तथरारक कामगिरी


सावदा : शहरातील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरीकेतील सॅनदिगो येथे सुमारे 13 हजार 500 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग विमानातून उडी घेऊन चित्तथरारक कामगिरी केली. तब्बल 13 हजार 500 फूट उंचीवर जाऊन विमानातून बलूनच्या मदतीने बाहेर पडून अवकाशात झेप घेण्याची कामगिरी आकाशने पार पाडली. मानसिक क्षमता आणि धाडसी वृत्तीचा कस लागणार्‍या या खेळात अत्यंत कमी संख्येने खेळाडू सहभागी होतात. ही कामगिरी सावदा येथील आकाश पाटील या खेळाडूने अमेरिकेत यशस्वीपणे पाडून देशाचा गौरव वाढवला आहे. आकाश पाटील सावदा येथील नानासाहेब विष्णू हरी पाटील यांचे पणतू व दादासाहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोजकुमार पाटील यांचा मुलगा आहे. अमेरीकेत त्याने एम.एस.अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. या कामगिरीबद्दल आकाशचे सावद्याचे माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील, मसाकाचे माजी संचालक नरेंद्र नारखडे, डॉ.गिरीश लोखंडे, डॉ.ए.के.जावळे, अमूल्य डहाणूकर, डॉ.पद्माकर पाटील, अनिल नारखेडे, औद्योगिक वसाहतीचे संचालक मंडळ, श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ, चंद्रशेखर चौधरी, योगेश भावसार, नितीन राणे, भास्करराव चौधरी, पंडित कोल्हे, शेखर चौधरी यांनी कौतूक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !