यावल तालुक्यात वादळी वार्याने केळीचे नुकसान
यावल : शहर पीसरात रविवारी झालेल्या वादळी वार्यासह पावसाने केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच वादळाचा जोर जास्त असल्यामुळे मोठ-मोठे वृक्ष उन्मळले तसेच काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्यामुळे बर्याच वेळ विद्युत तपुरवठा खंडित झाला. यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील स्वामी समर्थ नगरात नंदकिशोर दत्तू भारुडे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या नव्या कारवर वृक्ष पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेतातील उभे केळी पीक वार्यामुळे जमीनदोस्त झाले.




