वरणगावात इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन


वरणगाव : सातत्याने वाढत जाणार्‍या पेट्रेाल-डिझेलच्या किंमतीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारचा निषेध करीत पेट्रोल पंपावर जावून वाहनधारकांना गुलाबाचे फुल देत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले शिवाय रासायनिक खतांच्या किंमतीत होत असलेल्या दरवाढी विरोधात भुसावळ प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू भाई जकातदार, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मनोज कोलते, शहराध्यक्ष समाधान चौधरी, युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी, शहर उपाध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक गणेश चौधरी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, इफ्तेखार भाई मिर्झा, महेश जी.सोनवणे, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे, राजेश इंगळे, शेख एहसान शरदराव देशमुख, शेख रीजवान, ओबीसी सेल वरणगाव शहराध्यक्ष हिमालय भंगाळे, रवी पाटील, आकाश दिलीप झोपे आदी असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि राष्ट्रवादी प्रेमी नागरीक उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !