यावलमध्ये 98 वाहनधारकांवर कारवाई : चार दुकानांना सील
यावल : कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सोमवरी पोलीस वव पालिका प्रशासनाने धडक कारवाईला सुरूवात केली. यावल शहरातील बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गाला जोडणार्या प्रमुख मार्गावरील बुरुज चौकात सकाळह 11 वाजेनंतर कोविड नियमांचे पालन न करता अनावश्यक फिरणार्या 98 दुचाकी व चारचाकी वाहन धारकांवर कारवाई करीत 19 हजार 300 रुपयांप्रमाणे दंड वसुल करण्यात आला. प्रमुख मार्गावरील अनुपम रेडीमेड स्टोअर्स चालकाकडून 12 हजार रुपये, पाकीजा स्टोअर्स आठ हजार रुपये, रूपकला साडी सेंटर 10 हजार रुपये चव मंगलमूर्ती दुकान चालकाडून पाच हजार रुपये दंड वसुल करून दुकानांना सील लावण्यात आले. एकूण 74 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला तसेच नगरपरीषद व्यापारी संकुलनातील अनस मोबाईल शॉपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सलीम शेख, निलेश वाघ, भूषण चव्हाण, असलम खान, सुशील घुगे, ज्ञानेश्वर कोळी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्यासह यावल नगर परीषदेचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परीषदेचे स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, मुबीन शेख, रवी काटकर, संदीप पारधे, नितीन पारधे, रामदास घारू यांनी ही कारवाई केली.




