मुक्ताईनगरात रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
मुक्ताईनगर : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करून मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच दरवाढीचा निषेध करण्यात आला. ही दरवाढ रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र माळी, प्रदीप साळुंखे, माजी सरपंच प्रवीण पाटील, बापू ससाणे, आासीफ बागवान, शिवराज पाटील, संजय कोळी, राजू कापसे, सुनील काटे, सुनील पाटील, राजु चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मोदी सरकार हाय हाय, केंद्र सरकारचा निषेध असो, खतांची, पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे आदी घोषणा दिल्या.



