भरधाव चारचाकी दुचाकीवर धडकली : काकांसह दोघा पुतण्यांचा मृत्यू


जळगाव : भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात काकासह दोघा पुतण्यांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सात वाजता अक्कलकुवा तालुक्यातील डेडवा गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात कडगाव, ता.जळगाव येथील मोहन कडू मोरे (22), तसेच त्यांचे पुतणे कुणाल एकनाथ मोरे (7) व रोहित कैलास मोरे (8 हल्ली, रा. चिकालीफाटा, ता.सागबरा, गुजरात) यांचा मृत्यू झाला तर वहिनी मुक्ताबाई एकनाथ मोरे (35) या जखमी झालेल्या आहेत.

वाढदिवसावरून परतताना अपघात
मेहुण्याकडे असलेल्या नातेवाईकाच्या दोन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून दुचाकीवरून चौघे येत असताना समोरून आलेल्या भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. मोहन मोरे हा भाऊ एकनाथ व कैलास यांच्यासोबत अक्कलकुवा तालुक्यात विटा पाडण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून गेलेला होता. मोहन राहत असलेल्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर वीटभट्टयांवर त्याचे मेहुणे कामाला होते व त्याठिकाणी रीतेश नरेश शिरसाळे (2) या नात्यातील मुलाचा रविवारी वाढदिवस असल्याने त्यासाठी मोहन हा पुतणे कुणाल, मोहित व वहिनी यांना घेऊन दुचाकीने गेले होते. वाढदिवसाहून परतताना शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडे जाणार्‍या चारचाकी (क्र. एम.एच43 बी.यु.8162) ने दुचाकीला (एम.एच.19 बी.बी.5304) ला जोरदार धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले तर वहिनी मुक्ताबाई या जखमी झाल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !