रावेर कृउबा सभापती व उपसभापतींचा राजीनामा


रावेर : रावेर कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन व उपसभापती उस्मान तडवी यांनी आपला पदाचे राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यमान सभापती श्रीकांत महाजन यांचा पदाचा कार्यकाळ गत वर्षीच संपला होता. विद्यमान आमदार शिरीष चौधरी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी यांनी मुंबईत जाऊन मुदत वाढीसाठी प्रयत्न केले होते. यावेळी सहा महिने मुदतवाढदेखील मिळाली होती. सहा महिने मुदत संपली असून रावेर बाजार समितीला पुन्हा सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे परंतु यावेळी सभापती श्रीकांत महाजन व उपसभापती उस्मान तडवी यांनी आपला पदाचे राजीनामे दिले येत्या दि 20 रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होत आहे. यावेळी गोपाळ नेमाडे यांची सभापती पदावर तर गोंडु महाजन यांची उपसभापती पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !