प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे चार रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने चार रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गाडी क्रमांक 02169 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दैनिक विशेष गाडी तसेच ट्रेन क्रमांक 02170 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष गाडी 19 मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 02153 लोकमान्य टिळक टर्मिनस-हबीबगंज साप्ताहिक विशेष गाडी 27 मे पासून तसेच गाडी क्रमांक 02154 हबीबगंज-लोकमान्य तिलक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी 28 मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरातमधील चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे ट्रेन नंबर 08402 डाऊन ओखा-पुरी विशेष गाडी 19 मे रोजी रद्द करण्यात आली.




