सार्वजनिक शौचालयांसह स्वच्छतेची समस्या सोडवा


अ‍ॅड. तुषार पाटील : प्रभाग 10 मधील समस्यांबाबत मुख्याधिकार्‍यांना निवेदन

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये सार्वजनिक शौचालय, कचरा संकलन, गटारी, पथदिवे आदींची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे परीसरातील रहिवाशांना असुविधांचा सामना करावा लागत असून नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी अ‍ॅड.तुषार पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन दिले.

समस्या सोडवण्याबाबत साकडे
अ‍ॅड.पाटील यांच्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक 10 मध्ये दगडी पुलाजवळ सार्वजनिक शौचालय असून ते गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत असून मोठी अस्वच्छता निर्माण झाली आहे. तेथे पाणी आणि लाईटाची व्यवस्था नसल्याने महिला वर्गाची मोठी कुचंबणा होते. सार्वजनिक शौचालय दुरुस्त करून पाणी आणि लाईटाची व्यवस्था करावी तसेच प्रत्येक शौचालयास दरवाजे बसविण्यात यावे, अशी मागणी अ‍ॅड.पाटील यांनी केली आहे.



घंटागाडी सुरू करावी
प्रभागात नियमितपणे घंटागाडी येत नसल्याने कचराकुंड्या ओसंडून वाहत असल्याने कचरा रस्त्यावर येत आहे व परीसरात दुर्गंधी फैलावत आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. प्रभागातील गटारींची दुरववस्था झाली आहे. प्रभागातील पथदिवे गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत तर काही पथदिव्यांचे कनेक्शन हे डायरेक्ट असल्याने पथदिवे दिवसाही सुरू राहतात. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रभागातील आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी, नगरसेविका मेघा वाणी, देवा वाणी हे सर्वच वॉर्डात आवश्यक सोयी-सुविधा पुरवणेस नेहमी मदत करतात, असेही निवेदनात नमूद आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !