भुसावळातील पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांना एनर्जी ड्रिंक वाटप
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस काझी यांचा उपक्रम
भुसावळ : महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस.काझी यांच्यातर्फे पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना नुकतेच एनर्जी ड्रिंकसह नास्त्याचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस.काझी, शहर वाहतूक शाखेेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, तहसीलदार दीपक धीवरे, उपमुख्याधिकारी महेंद्र कथोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकार्यांनी मोहसीन काझी यांच्य उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, बाजार पेठ पोलिस ठाण्यासह, जामनेर रोडवरील एसीबीआय आनंद शाखेजवळ, रजा टॉवर, गवळी वाडा व गांधी पुतळा भागात हा उपक्रम राबवण्यात आला.



