शेतात काम करतांना अल्पवयीन बालकास सर्पदंश
यावल : तालुक्यातील वड्री येथे शेतात टरबूज वाहतुकीचे काम करतांना एका 16 वर्षीय बालकास सर्पदंश झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. बालकावर यावल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राकेश बन्सी बारेला (16, रा.लसुनबर्डी) हा बालक बुधवारी सकाळी वड्री शिवारात शेतात टरबुज वाहतुकीचे काम करत असताना त्याच्या उजव्या पायाला सर्पाने दंश केला. ही बाब लक्षात येताच त्यास यावल ग्रामीण ररुग्णालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले येथे. डॉ.बी.बी.बारेला, डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारीका मंजुषा कोळेकर आदींनी उपचार केले.




