अवैद्य गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
यावल : शहरातील मंडळ अधिकार्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करीत ट्रॅक्टर मालकांस दंडा संबधी नोटीस बजावलत ट्रॅक्टर यावल पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर (क्र.एम. एच. 19 बी. जी. 1602) हे मंडळाधिकारी शेखर तडवी यांच्या पथकास आढळताच त्यांनी टॅ्रक्टर मालकास दंडात्मक कारवाई संदर्भातील नोटीस दिली. ही कारवावई मंडळ अधिकारी शेखर तडवी, तलाठी ईश्वर कोळी सह चुंचाळे, कोरपावली, विरावली, कोळवद येथील तलाठी व कोतवाल आदींनी केली.




