वढवे शिवारात अनोळखीचे प्रेत आढळले
मुक्ताईनगर : तालुक्यातील वढवे शिवारात बोहर्डी रस्त्यालगत गुरुवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास 40 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. अनोळखीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. मयताच्या अंगावर पांढरा प्लेन फुल शर्ट व निळ्या रंगाची अंडरवियर आहे. उंची पाच फूट पाच इंच इतकी आहे. अंदाजे 10 ते 12 दिवसांपूर्वी म्ृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वढवे पोलिस पाटील किरण बोठे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक खंडारे करीत आहेत.




