कोरोना रुग्ण संख्या घटली : जिल्ह्यात 357 बाधीत आढळले


एकाच दिवसात 675 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 357 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 10 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 675 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2460 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 675 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 37 हजार 136 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 25 हजार 533 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 44
जळगाव ग्रामीण 26
भुसावळ 47
अमळनेर 15
चोपडा 47
पाचोरा 04
भडगाव 05
धरणगाव 14
यावल 10
एरंडोल 00
जामनेर 13
रावेर 20
पारोळा 09
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 40
बोदवड 29
अन्य जिल्हा 07



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !