किनगावात एकाच दिवशी पाच ठिकाणी चोर्या
यावल : एकाच वेळी चोरट्यांनी पाच घरांमध्ये चोर्या करीत किंमती मुद्देमाल लांबवल्याची घटना तालुक्यातील किनगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, एन.आर.पाटील, संजय सयाजी पाटील, युवराज पोलाद चौधरी (आत्माराम नगर) , अर्जुन सुतार यांच्या घरातील साहित्यासह जुन्या गावातील लिलाबाई बिर्हाडे यांच्या घरातून 10 हजार रुपये चोरीस गेल्याचे समजते तर एन.आर.पाटील यांचा मुलगा हेमंत पाटील याला जाग आल्याने त्याची चोरट्यांशी झटापट होताच चोरटे पसार झाले. ग्रामस्थ घरात गाढ झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीतून प्रवेश करीत चोरी केली.




