रावेर पं.स.च्या आढावा बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा


रावेर : रावेर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक सभापती कविता कोळी यांच्या अध्यक्षेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी कोरोना व्हायरस प्रलंबीत कामे यांच्यासह विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सचिव म्हणून गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी कामकाज पाहिले. बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, बस महामंडळ, कृषी विभाग, जिल्हा परीषद बांधकाम विभाग, बालविकास प्रकल्प, पशूसंवर्धन, शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार विभागाचे अधिकारी यांनी बैठकीत आपल्या विभागाचा आढावा मांडला.

मासिक बैठकीत यांनी घेतला सहभाग
ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, दीपक पाटील, जुम्मा तडवी, पी.के.महाजन, योगेश पाटील, माधुरी नेमाडे, योगीता वानखेडे, प्रतिभा बोरवले आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !