गोदावरी रुग्णालयात बाथरूममध्ये आढळला कट्टा
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी रुग्णालयातील आरोपींवर उपचार करण्यासाठी असलेल्या कक्षातील बाथरूममध्ये शुक्रवारी सायंकाळी गावठी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली. हा कट्टा नेमका येथे कुणी व का आणला? याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. या संदर्भात पोलिस गार्ड यांच्याकडून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकार्यांनी गोदावरी हॉस्पीटलमधे धाव घेतली.




