प्रवाशांना अल्प प्रतिसाद : एलटीटी-हावडा ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 02101/02102 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष ट्रेन आठवड्यातून चार दिवसांऐवजी दोन दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 02101 लोकमान्य टिळक टर्मिनसहावडा विशेष गाडी 24 मे ते 26 जूनदरम्यान आठवड्यातून मंगळवार आणि शनिवारी धावणार आहे. ट्रेन क्रमांक 02102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 26 मे ते 30 जूनदरम्यान गुरुवार आणि सोमवारी धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.




