माजी सरपंचांचा माणुसकी धर्म : मृत मित्राच्या वारसास मदत


मुक्ताईनगरात फळ विक्रेता व ग्राहकात निर्माण झाले होते नाते ; मुलाच्या मृत्यूच्या धसक्याने आईने सोडले प्राण

मुक्ताईनगर : फळ विक्रेत्याकडून फळ विकत घ्यायची दोन शब्द प्रेमाचे बोलायचं आणि निघायचं असा नित्यक्रम नेहमी असायचा यामुळे फळ विक्रेता व कर्कीतील माजी सरपंच असलेल्या ग्राहकात घनदाट मैत्री झाली होती परंतु गेल्या दोन आठवड्यापूर्वी कोरोनाने घरात शिरकाव केला आणि फळ विक्रेत्यासह त्याची आई कोरोना पॉझीटीव्ह झाल्याने दोघांवर जळगावात उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना फळ विक्रेत्याने शेवटचा श्वास घेतला व घरातील कर्ता पुरुष गेल्याने घराची दाणादान झाली. ऐन पस्तीशीतला तरुण मुलगा गेल्याचा धसका घेतल्याने त्याच्या आईनेदेखील प्राण सोडले. एका मागून एक आलेल्या संकटाने फळ विक्रेत्याचा परीवार हादरला व ग्राहक व विक्रेत्यात काही काळ का असेना मैत्री झाल्याने कर्कीतील माजी सरपंचांनी माणुसकी धर्म निभावत मयत फळ विक्रेत्याच्या वारसास दहा हजारांची मदत दिली. प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होती.

आमदारांच्या उपस्थितीत केली मदत
शहरातील फळ विक्रेता शेख शरीफ शेख नूरा मणियार यांचे निधन झाले व त्यांच्या आईचादेखील अवघ्या दोन दिवसात मृत्यू झाला. कुटुंबातील शेख शरीफ एकमेव कमावती व्यक्ती होते. याची माहिती मिळताच कर्की ता- मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे माजी सरपंच प्रवीण गंभीर महाजन यांनी ह्या कुटुंबातील सदस्य शेख हसन मणियार यांच्याकडे 10 हजार रुपयांची रोख मदत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दिली.



यांची होती उपस्थिती
प्रसंगी कलिम मणियार, मुशीर मणियार, शकुर जमादार, सलिम खान, जफर अली, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक राजू हिवराळे, गोपाळ सोनवणे आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !