रीक्षा चालकांच्या मदतीला रोटरी रेलसिटी धावली


 

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे शहरातील रीक्षा चालक बांधवांना प्लास्टिक कर्टन पडद्यांचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे शासनाने अनेक निर्बंध लावले आहे त्यातच रीक्षा चालकांनाही कोरोना संसर्गापासुन संरक्षणासाठी रीक्षाच्या मध्यभागी प्लास्टिक पडदा लावण्याची सक्ती करण्यात आली असुन नियम मोडणाऱ्या चालकांना दंडही आकारण्यात येत आहे परंतु लॉकडाऊन मुळे व्यवसाय ठप्प असल्याने रीक्षा चालकांची आर्थिक कोंडी होत असल्याने रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने पुढाकार घेतला व भुसावळ शहरातील सर्व रीक्षा चालक बांधवांना मोफत प्लास्टिक कर्टन पडदा वाटप करण्यात आला. रविवारी दुपारी गांधी पुतळा, यावल रोड येथे रीक्षा चालकांना आमदार संजय सावकारे, भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा यांच्याहस्ते प्लास्टिक कर्टन पडदा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणुन संदीप सुरवाडे काम पाहत आहे. प्रोजेक्ट यशस्वीतेसाठी क्लबचे सदस्य विकास पाचपांडे, चेतन पाटील, मंगेश यावलकर, अमित भडंग, मनोज सोनार, प्रा.श्रीकांत जोशी, प्रा.पंकज भंगाळे, डॉ.मकरंद चांदवडकर, तुलसी पटेल, आशिष अग्रवाल, रजत बढे यांनी सहभाग घेतला.



 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !