उपनगरी व मेल एक्स्प्रेस 21 रोजी अचूक वेळेत धावल्या
भुसावळ : मध्य रेल्वेने 21 मे रोजी रेल्वेगाड्यांच्या वेळेबाबत शंभर टक्के वक्तशीरपणा (राईट टाईम) साध्य केला. कोविड 19 च्या दुसर्या लाटेदरम्यान मध्य रेल्वेच्या समर्पित टीम 24 तास कार्यरत असून 21 मे उपनगरी आणि मेल एक्स्प्रेस सेवा शंभर टक्के वेळेवर धावल्या. 2020-21 मध्ये मध्य रेल्वेने मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबत 95.5 टक्के व उपनगरी ट्रेनबाबत 94.4 टक्के वक्तशीरपणा गाठला तसेच एप्रिल 2021 मध्ये मेल/एक्स्प्रेस गाड्या 96.9 टक्के आणि उपनगरी ट्रेन 97.5 टक्के वक्तशीरपणे चालल्या. मालवाहतूक, पार्सल, ऑक्सिजन गाड्या चालविण्याशिवाय मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉक कालावधी दरम्यान मान्सूनपूर्व उपक्रम आणि देखभालीचे निरंतर विविध उपक्रम राबविले आहेत.




