चक्रीवादळामुळे चार रेल्वे गाड्या झाल्या रद्द
भुसावळ : चक्रीवादळ चक्रीवादळ वायएएसच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 02221 पुणे-हावडा दुरांतो विशेष गाडी 24 मे रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02222 हावडा-पुणे दुरांतो विशेष गाडी 24 मे रोजी सुटणारी तसेच गाडी क्रमांक 02818 पुणे-हावडा विशेष गाडी 24 मे रोजी सुटणारी व गाडी क्रमांक 02818 हावडा-पुणे विशेष गाडी 29 मे रोजी सुटणारी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



