वादळी पावसाने केळीला फटका : तत्काळ पंचनाम्याच्या सूचना
रावेर : रावेर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. केळी पिकांचे नुकसान झाल्यानंतर पिकांच्या नुकसानीची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी करीत तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. रावेर परीसरातील पूर्व भागात मंगळवारी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात केळीच्या पिकांचे नुकसान झाले. त्यातील निरूळ, पाडळे, अहिरवाडी येथील काही गट नंबरमधील केळीला फटका बसला. बुधवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी नुकसानीची पाहणी केली व नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.




