रावेर शहरात पालिकेकडून रस्त्यांच्या कामाला सुरुवात
महेमूद शेखच्या मागणीला आले यश : नागरीकांमध्ये समाधान
रावेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमूद शेख यांच्या निवेदनाची दखल घेऊन नगरपालिकेने शनी मंदिर ते स्टेशन रोड रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पालिकेने यासाठी 72 लाख रुपये मंजूर केले आहे.
मुख्याधिकार्यांनी घेतली निवेदनाची दखल
रावेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमूद शेख यांनी 6 एप्रिल रोजी रावेर नगरपालिकेला मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना निवेदन दिले होते व निवेदनाद्वारे शनी मंदिर ते स्टेशन रोड दरम्यान पडलेले खड्डे बुजवून नवीन रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. या निवदेनाची दखल घेऊन रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली. रावेर नगरपालिकेने या रस्त्याच्या कामांवर 72 लाख रुपये मंजूर केल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



