कोरोनामुळे बळी घेतलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांच्या वारसांना फ्रंट लाईन वर्करप्रमाणे मिळावी भरपाई


भुसावळ : कोरोनासारख्या कठीण काळातही अविरत रेल्वेसाठी सेवा देणार्या भुसावळ विभागातील विविध पदावरील सुमारे 150 कर्मचार्यांचा मृत्यू झाला असून या कर्मचार्‍यांच्या वारसांना रेल्वे प्रशासनाने फ्रंट लाईन वर्करप्रमाणे 50 लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी आपले मानवाधिकार फाउंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांचे कोरोना काळात योगदान महत्त्वाचे
मयूर अंजाळेकर यांनी पाठवलेल्या निवेदनानुसार, कोरोना कठीण काळातही रेल्वे अविरत धावली. रेल्वे गाड्या बंद असण्याच्या काळात गुडस् वाहतूक मात्र सुरू ठेवण्यात आली व त्यासाठीदेखील रेल्वे कर्मचारी अहोरात्र सेवेत राहिले तर टप्प्या-टप्प्याने आरक्षीत रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतरही रेल्वे कर्मचार्यांनी सेवा बजावली मात्र सेवा बजावताना कोरोना संसर्गामुळे भुसावळ विभागातील विविध पदांवर कार्यरत सुमारे 150 खलासी, गँगमन, लोकोपायलट, गँगमन, रुग्णवाहिका चालक यासह तृतीय वा चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कराप्रमाणे या कर्मचार्‍यांनी सेवा दिल्याने त्यांच्या वारसांनादेखील फ्रंटलाईन वर्कराप्रमाणे 50 लाखांची भरपाई मिळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !