भुसावळात वाहतूक पोलिसांची 150 वाहनांवर कारवाई


भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यावर सुध्दा विनाकारण फिरणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुरूवारी शहर वाहतूक शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी 150 जणांवर कारवाई करीत 37 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मेडीकल व हॉस्पीटलमध्ये जाणार्‍यांनाच सोडले जात आहे. गुरूवारी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांनी 150 वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 37 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्यचे सहा.निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !